sangli dcc bank saam tv
महाराष्ट्र

काेट्यावधींचं कर्ज हाेणार माफ? DCC च्या सभेवरुन शेतकरी, 'स्वाभिमानी' आक्रमक

सभेतील विषयांवरुन वादंग निर्माण हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (sangli dcc bank) येत्या शनिवारी (ता. १९) ऑनलाईन (online) पद्धतीने विशेष सर्वसाधारण सभा बाेलविण्यात आली आहे. या सभेपुर्वीच सांगली (sangli) जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या सभेतील विविध विषयांवर शेतकरी (farmer) व शेतक-यांच्या (farmers) संघटना नाराज झाल्या आहेत. शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेत (dcc bank) राजकीय नेत्यांना सवलत आणि शेतकरी वाऱ्यावर अशी दुटप्पी भूमिका बॅंकेची झाल्याचे मत शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. (sangli dcc bank latest marathi news)

जिल्ह्यातील माेठ्या नेत्यांच्या संस्थांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या नियोजनात नेत्यांच्या संस्थांचे कर्जावरील सुमारे १०० कोटीचे व्याज माफीची योजना आहे. याशिवाय अनेक माेठ्या नेत्यांच्या संस्थांचे ७६ कोटी रुपये कर्ज राईट ऑफचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.

त्यातच बॅंकेचे सीईआे जयवंत कडू-पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान बँकेने चुकीच्या पध्दतीने माेठ्या नेत्यांच्या संस्थांना कर्ज दिले. या संस्था सध्या बंद आहेत. बँकेने या संस्था ताब्यात घेतल्या असल्या तरी या संस्थांकडे थकबाकीचा आकडा वाढतच आहे. कारखाने ताब्यात घेऊन काय फायदा? उलट याने थकबाकीदार संस्थांकडील व्याज बुडाले, तरीही कारखाने खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च, देखभाल दुरुस्ती, वीज बिल आदीसाठी भुर्दंड बॅँकेवरच बसतोय. शेतकऱ्याच्या जीवावर बँक चालते आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या शनिवारी (ता. १९) बोंबा बोंब आंदोलन छेडणार असल्याची माहिती महेश खराडे यांनी दिली. जिल्हा बॅंकेच्या कारभाराविषयी शेतकरी संघटनेचे सुनील फडतरे यांनी देखील नाराजी व्यक्त करीत बॅंक शेतक-यांच्या हिताचा विचार करीत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाऱ्यावर सोडत असेल आणि राजकीय नेत्यांना मोठे करत असेल तर शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील असे शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय विभूते यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT