sangli double murder at birthday party uttam mohite killed : Saam TV
महाराष्ट्र

भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅटर्न', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

sangli double murder at birthday party uttam mohite killed : सांगली जिल्ह्यात मुळशी पॅटर्नस्टाईलने दुहेरी हत्याकांड घडले आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करताना गुप्तीने हल्ला करून खून करण्यात आला. हल्लेखोर शाहरुख शेख याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

  • सांगलीत दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करताना गुप्तीने खून झाला.

  • हल्लेखोर शाहरुख शेख याचाही प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

  • वाढदिवस कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ८ ते १० जणांमध्ये वाद झाल्याने हल्ला घडला.

  • पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे.

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

mulshi pattern style murder shocks sangli maharashtra : दुहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरलाय. मुळशी पॅटर्न चित्रपटातील एखाद्या प्रसंगाप्रमाणेच सांगलीत थरार घडला. वाढदिवसाच्या पार्टीत १०-१२ जणांसोबत आला. जेवण केले अन् स्टेजवर शुभेच्छा द्यायला गेला. त्यावेळी गुप्ती काढली अन् उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार केले. वाढदिवसालाच उत्तम मोहिते यांचा मृत्यू झाला. तर हल्ला करणाऱ्याचे नाव शाहरुख शेख असे आहे. मोहितेंवर शेख याने वर्चस्वातून हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मोहितेंच्या माणसांनी त्याचवेळी शेखवर हल्ला केला. त्याला बेदम मारले. उपचारावेळी शेख याचाही मृत्यू झाला. सांगलीमधील या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.

दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मुळशी पॅटर्न स्टाईलने घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला आहे. याच घटनेदरम्यान एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला. अगदी हुबेहूब मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे हा सगळा थरार घडला आहे. सांगली शहरांमध्ये दुहेरी खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा धारदार शत्रांनी खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करताना हल्लेखोरांच्या मधील एकाचा चाकू लागून मृत्यू देखील झाला आहे.

उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, दलित महासंघ मोहिते गटाचे ते संस्थापक अध्यक्ष देखील होते. सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर हटके पद्धतीने मोर्चे काढण्यासाठी त्यांची ओळख होती. त्याशिवाय उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. घरासमोरच उत्तम मोहितेंनी स्टेज टाकले होते.. डिजिटल फ्लेक्स लावले, जेवणाची पंगत, केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यावेळी उत्तम मोहितेंवर हल्ला करणारे हल्लेखोर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर शुभेच्छा देताना उत्तम मोहिते आणि हल्लेखोरांच्या मध्ये वादावाद झाली. त्यानंतर काही वेळातच मोहितेंवर हल्ला चढवला.

आठ ते दहा जणांकडून उत्तम मोहिते यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. हा हल्ला होत असताना यामध्ये हल्लेखोर असणारा शाहरुख शेख याला चाकूचा वर्मी घाव मांडीला बसला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सकाळी त्याचा मृत्यू झाला. उत्तम मोहिते यांच्या खूनाच्या घटने प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT