Sangli Crime x
महाराष्ट्र

Sangli Crime : खिशातून पैसे काढले, दारुच्या नशेत तरुणाने डोक्यात दगड घालून केला जिवलग मित्राचा खून

Sangli Crime News : सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला आहे. मित्राला ठार केल्यानंतर आरोपी तरुण पोलीस ठाण्यात हजर झाला.

Yash Shirke

  • सांगलीमधील भयंकर घटना उघडकीस आली आहे.

  • एका तरुणाने त्याच्या जिवलग मित्राचा खून केला.

  • दारुच्या नशेत मित्राच्या डोक्यात तरुणाने दगड घातला.

  • या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sangli : दारुच्या नशेत एकाने डोक्यात दगड घालून त्याच्या मित्राचा खून केला. खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या कारणावरुन मित्रांमध्ये वाद झाला. यातून आरोपीने त्याच्या मित्राला ठार केल्याचे म्हटले जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळाला आणि स्वत:हून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. ही घटना सांगलीमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुर साठे (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव प्रताप चव्हाण (वय २४ वर्षे) आहे. मयुर हा वॉचमन म्हणून काम करतो. तो मीरज तालुक्यातील सोनि या गावामध्ये कुटुंबासह राहत होता. मयुर साठे आणि प्रताप चव्हाण हे दोघे लहानपणापासून मित्र होते, त्या दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते.

बुधवारी (६ ऑगस्ट) मयुर आणि प्रताप दोघांनी दिवसभर सोबत हॉटेलमध्ये जोरदार पार्टी केली. ते दोघे प्रचंड दारु प्यायले. यादरम्यान मयुरने आरोपी प्रतापच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागातून आरोपीने बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतीतील महावितरण कार्यालयाच्या बाजूला डोक्यात दगड घालून मयुरची हत्या केली.

मयुरला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचे दिसताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. तो स्वत:हून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करुन आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT