Sangli witness kidnapping and murder latest news Saam TV marathi
महाराष्ट्र

राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

Shinde Sena youth leader arrested in murder case : सांगली जिल्ह्यातील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Sangli witness kidnapping and murder latest news : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १४ तासांत ३ संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीच्या एका शहरप्रमुखाचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मयत दादासो यमगर हे कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील साक्षीदार होते. मंगळवारी ते या खटल्यासंदर्भात न्यायालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी जात होते. मात्र, वाटेतच संशयितांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर कर्नाटकच्या अथणी तालुक्यातील मदभावी येथे नेऊन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

संशयितांनी खुनाचा हा प्रकार लपवण्यासाठी दादासो यमगर यांचा मृतदेह एका झाडाला लटकवून दिला होता. हा घातपात नसून आत्महत्या असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील सत्य समोर आणले. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली होती. अवघ्या १४ तासांच्या आत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. यात शिंदेसेनेच्या युवा शहर प्रमुखाचा सहभाग समोर आल्याने पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये शेतातील वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी एका गटाने केलेल्या हल्ल्यात विकास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासाहेब यमगर या दोघांचा मृत्यू झाला होता. या खुनामध्ये दादासाहेब नामदेव यमगर हे मुख्य साक्षीदार होते. दरम्यान या खुनाचा खटला न्यायप्रविष्ठ असून मंगळवारी याची न्यायालयात तारीख होती. या तारखेला दादासाहेब यमगर यांचा जबाब नोंदविण्यात येणार होते. न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांचे अपहरण झाले होते. त्यांच्या अपहरणाची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. परंतु अपहरणानंतर २४ तासाच्या आतच कर्नाटकातील मदभावी येथे झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दादासाहेब यमगर यांचा मृतदेह मिळून आला. या प्रकरणात ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT