Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधींचे सोने व रोकड लांबविली

Sangli News : दरोडेखोरांनी पूर्ण प्लॅनिंग करत घरात प्रवेश केला, समोरच्यांना इनकम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगत सर्च वॉरंट दाखविले यानंतर घराची झडती घेत घरातून ऐवज घेऊन फरार झाले

विजय पाटील

सांगली : अक्षय कुमारच्या 'स्पेशल २६' या चित्रपटाच्या कथेप्रमाणे बनावट आयकर अधिकारी बनून एका डॉक्टराच्या घरात दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतल्या कवठेमहांकाळमध्ये समोर आला आहे. या प्रकारात डॉक्टराच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड लुटण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

सांगलीच्या कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक दरोड्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. शहरातील नामांकित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी कोट्यवधींचे सोने व रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे प्रसिद्ध हिंदी चित्रपट स्पेशल 26ची आठवण शहरवासीयांना झाली आहे. 

सर्च वॉरंट दाखवत घराची झडती 

दरम्यान चार जणांनी रविवारी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला.डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली. ज्यामध्ये घरात असणारी १६ लाखांची रोकड तसेच तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास २ कोटींचे जप्त करत असल्याचे सांगत या चारही बनावट आयकर अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.  

पोलिसांकडून तपास सुरु 

मात्र या प्रकरणानंतर डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना घडल्या प्रकारची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेत, आयकर छापा बोगस सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 10 Exam Pattern Change : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, प्रमुख विषयांच्या परीक्षेत महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

Viral Video: विमानात फ्री स्टाईल हाणामारी, त्याने गळा पकडला, तिने पोटात बुक्क्या मारल्या, पाहा व्हायरल व्हिडिओ

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी छावा संघटनेचा रस्ता रोको आंदोलन

Patwadi Recipe : मऊ लुसलुशीत पाटवडी बनवण्याची झटपट अन् सोपी पद्धत

Gadchiroli : स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी, गावात तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT