Risod Police : फसवणूक करत वर्षभरापासून फरार; रिसोड पोलिसांनी घेतले ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Washim News : पोलिसांनी चौकशी केली असता ३ ई-स्कूटीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीस खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले
Risod Police
Risod PoliceSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: फसवणूकीच्या गुन्ह्यात पटाईत असलेला आणि नेहमी आपला ठावठिकाणा बदलत अनेकांना गंडा घालणाऱ्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र मागील एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला रिसोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास करत बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन इ स्कुटीसह साधारण १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वाशिमच्या रिसोड पोलिसांची या महिन्यातील पाचवी दमदार कामगिरी केली आहे. परवेज युसूफ देशमूख (वय ४७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान रिसोड येथील एका इ मोटर्स दुकानातून परवेज देशमूख याच्यासह सादीक देशमूख व शेख तनविर शेख हारूण (सर्व रा. उर्दु प्राथमिक शाळा, राणी पार्क जळगाव जामोद, ता.जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांनी संगनमत करून फिर्यादीचे विश्वास संपादन करून फिर्यादीच्या दुकानातून ३ ई-स्कूटी रक्कम नंतर देऊ असे सांगून घेतल्या. 

Risod Police
Ladki Bahin Yojana: ४ लाख लाडक्या बहिणींनी दिले खोटे पत्ते; अंगणवाडी सेविका गेल्यावर घरेच नव्हती, धक्कादायक माहिती उघड

ठिकाण बदलत असल्याने पडण्यात अडचण 

मात्र या स्कुटीची कोणतीही रक्कम न देता फसवणूकीने घेवून केल्या प्रकरणी ई मोटर्स विक्रेत्याने रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे फसवणूकीचे गुन्हे करण्याच्या सवईचे असून ते नेहमी आपला ठावठिकाणा बदलत असल्याने तसेच मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करीत असल्याने पोलीसांना त्यांना पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

Risod Police
Pathardi Heavy Rain : पाथर्डीत ढगफुटी; अनेक गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली

जळगाव जामोद येथे आला असता अटक 
तसेच आरोपी हे वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून पोलीसांची दिशाभूल करीत होते. यावरून डीबी पथकाने सायबर सेलच्या मदतीने आरोपींचे प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास केला. यानंतर परवेज देशमूख हा पोलीसांची नजर चुकवून एका दिवसासाठी जळगाव जामोद येथे आल्याची गुप्त माहिती मिळाली. या वरून १२ सप्टेंबरला सिनेस्टाईलने आरोपी परवेज युसूफ देशमूख यास जळगाव जामोद येथून मोठ्या शिताफीने पकडून अटक केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com