sangli  
महाराष्ट्र

Video पहा : आले रे आले चोर गणपती आले; उत्सवास प्रारंभ

विजय पाटील

सांगली : गणेश चतुर्थीच्या चार दिवस पुर्वी येथे चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची येथे शतकांची परंपरा आहे. आज (मंगळवार) सांगली येथील गणपती मंदिरात चोर गणपती दिमाखात प्रतिष्ठापित करण्यात आला. भाविकांनी त्याचे मनाेभावे बाहेरुन दर्शन घेतले. sangli-chor-ganpati-ganeshotsav-2021-trending-news-sml80

श्री गजानन हे सांगली येथील आराध्य दैवत. सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस पुर्वी या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. ही परंपरा शतकाची आहे. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. यंदा देखील त्याची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परंतु यंदा काेविड १९ च्या महामारीमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाप्पाचे बाहेरूनच दर्शन घेतले.

या परंपरेबाबत पुजारी रमेश पाटणकर म्हणाले गेली १५० वर्षांपासून चाेर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यंदा देखील गणेशाचे प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली गेली आहे. हा दीड दिवसाचा गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही तर जतन केले जाते. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते.

या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला येथे नेहमीप्रमाणे श्रींची स्थापना करण्यात येते. उत्सव काळात पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी राज्यातून भाविक येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची आख्यायीका आहे. येथे एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.

पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. परंतु यंदा कोरोनामुळे कोणतेही धार्मिक कार्यक्रम माेठ्या प्रमाणात आयाेजित करण्यात आलेले नाहीत. उत्सवकाळात देखील भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra News Live Updates: प्रकाश निकम यांची शिंदे गटातून हकालपट्टी

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS: BGT आधी टीम इंडियाचा तळ्यात मळ्यात कारभार! 2 प्रश्नांनी वाढवलंय टेन्शन

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या कमाईत मोठी घट; सात दिवसांचं कलेक्शन किती झालं? वाचा

SCROLL FOR NEXT