Chandrahar Patil Meet Eknath Shinde Saam Tv News
महाराष्ट्र

मोठी बातमी! 'ज्या' पैलवान नेत्यासाठी ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला, तोच बडा पुढारी शिंदेंच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Chandrahar Patil Meet Eknath Shinde : चंद्रहार पाटील हे पैलवान असून सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे.

Prashant Patil

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आता समोर आलीय. ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याला निमित्त आहे ते म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये घेतलेली भेट. इतकंच नव्हे तर त्यांनी शिंदेंच्यां पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

चंद्रहार पाटील हे पैलवान असून सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. काल गुरुवारी रात्री उशिराने ही भेट झाली आहे. उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीवर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले आहेत की, 'मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी आणि उदय सामंत याची भेट झाली', असं चंद्रहार पाटलांनी सांगितलं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी सांगलीची जागा चांगलीच चर्चेत आली होती. त्या जागेवरुन महाविकास आघाडी तुटतेय की काय? अशीही चर्चा सुरू झाली होती. त्याला कारण होतं ते म्हणजे चंद्रहार पाटलांची उमेदवारी. कोल्हापूरची ठाकरेंची जागा ही काँग्रेसच्या शाहू महाराजांना देण्यात आली. त्या बदल्यात ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर घोषित केली. त्याच जागेवर काँग्रेसचे विशाल पाटील हे देखील तयारी करत होते आणि विश्वजीत कदमांची ताकद त्यांच्यामागे होती.

सांगलीची जागा ही कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहिली पाहिजे यासाठी ठाकरे कमालीचे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसशी उघड उघड पंगा घेतला. विश्वजीत कदमांनी आणि विशाल पाटलांनी दिल्लीचे उंबरठेही झिजवले. परंतु भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढणं गरजेचं असल्यानं त्यांना काँग्रेसमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ही जागा ठाकरेंच्या पारड्यात गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT