Sangli Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Sangli Breaking News: शेततळ्याकडे फिरण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडली. सांगलीच्या तासगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विजय पाटील

सांगली, ता. १९ मे २०२४

शेततळ्याकडे फिरण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडली. हर्ष अतुल सुखदेव आणि आदित्य अतुल सुखदेव अशी दोन्ही भावंडांची नावे आहेत. सांगलीच्या तासगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्ष अतुल सुखदेव (वय, 16) आणि आदित्य अतुल सुखदेव (वय 12) दे दोघेही भाऊ आपल्या आई-वडिलांसह मुंबईहुन नेहरुनगरमध्ये राहतात. सध्या ते उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त सांगलीला आपल्या गावी आले होते. शनिवारी हे दोघे भावंड घरात कोणालाही न सांगता शेतातील शेततळ्याकडे गेली.

यावेळी दोघेही पायघसरून शेतातील शेततळ्यात पडले, ज्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन या दोघा भावंडांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हर्ष आणि आदितच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या आई- वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT