sangli bjp karykarta protest against mva government 
महाराष्ट्र

'महाभकास आघाडीला ओबीसींचे काही देणं- घेणं नाही' : भाजप आक्रमक

विजय पाटील

सांगली (sangli news) : न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे ओबीसी आरक्षणला स्थगिती मिळाली आहे असा आरोप सांगली येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या वागण्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी येथे केला. परंतु पोलिसांनी तातडीने पुतळा काढून घेत आंदाेलकांना समज दिली.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणला नुकतीच स्थगिती दिली. राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा सादर केला नाही. तसेच ओबीसी समाजाची बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे असा आरोप करत भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला. भाजपने राज्य सरकारचा निषेध करताना सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हा पुतळा काढून घेतला.

या महाभकास आघाडीने ओबीसी आरक्षण बाबत गांभीर्य नाही. ओबीसी समाजाचे काही देणं घेणं नाही. त्यामुळेच व्यवस्थित बाजू मांडली नाही असा आरोप भाजप नेत्यांनी आंदाेलनादरम्यान केला आहे. हे आंदाेलन sangli bjp karykarta protest against mva government सांगलीच्या भाजप कार्यालय समोर कार्यकर्त्यांनी केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT