Sangli Attack | Sangli Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Attack: जमिनीच्या वादातून जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात-पाय ताेडले

जाडरबाेबलाद येथील बरुर भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: मंगळवेढा तालुक्यातील माराेळी येथील सांगलीच्या जतच्या जाडरबाेबलाद येथील वनक्षेत्रात  दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आलाय. तलवारीने वार करत हात-पाय ताेडण्यात आले. जंगलात दबा धरुन बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद आणि शेतजमिनीवरुन सुरु असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याची माहिती समाेर येत आहे (Sangli Attack On Three By Sword Due To Land Dispute). 

सांगलीतील (Sangli) मंगळवेढा तालुक्यातील माराेळी आणि जत तालुक्यातील जाडरबाेबलाद दरम्यान वन विभागाचं क्षेत्र आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असताे. जाडरबाेबलाद येथील बरुर भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. रविवारी विठ्ठल बरुर, दयानंद बरुर आणि महादेव बरुर हे तिघे एकाच दुचाकीवरुन जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले हाेते.

अंत्यविधी आटाेपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला (Attack) चढवला. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उमदी आणि मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर हल्लेखाेरांचा जखमींबरोबर मागील काही दिवसांपासून जमिनीवरुन वाद (Land Dispute) सुरु असून आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर लावण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. याच कारणावरुन ही घटना घडली असावी असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT