Crime: तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचावर जीवघेणा हल्ला; जुन्या भांडणावरुन हल्ला

यात्रेच्या तमाशा कार्यक्रमात रात्रीच्यावेळी हा हल्ला झाला आहे.
crime
crimesaam tv
Published On

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे सरपंचासह एकावर जीवघेणा हल्ला (Crime) झाल्याची घटना समोर आली आहे. वडगावपीर यात्रेच्या तमाशा कार्यक्रमात रात्रीच्यावेळी हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंचासह एकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. हा हल्ला संशयीत आरोपी संतोष राजगुडे याने केला असल्याची माहिती समोर आली आहे. मंचर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात सरपंच संजय पोखरकर, आणि फकिरा आदक हे गंभीर जखमी झाले आहेत. वडगावपीर यात्रा सुरु आहे. यात्रेनिमित्त तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान रात्रीच्यावेळी आरोपी संतोष राजगुडे याने सरपंचासह एकावर हल्ला केला.

crime
Crime: उधारी पडली महागात; केवळ तीनशे रुपयांसाठी केली दांडक्याने हत्या

जुन्या भांडणाचा आणि बोअरवेलच्या (Borewell) पाण्यावरुन मनात राग धरुन या आरोपीने सरपंचावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सरपंचासह एकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. आरोपीवर मंचर पोलीसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com