Milk Price Saam tv
महाराष्ट्र

Milk Price : दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; तासगाव तहसीलवर जनावरांसह मोर्चा, अकोले तालुक्यात शेतकऱ्यांनी केले मुंडन

Sangli Ahmednagar News : दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. गाईच्या दुधाला किमान ४० रुपये व म्हशीच्या दुधाला किमान ६० रुपये प्रतिलिटर इतका दर मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे

Rajesh Sonwane

विजय पाटील/ सचिन बनसोडे 

सांगली/ अहमदनगर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. गाईच्या दुधाला किमान ४० रुपये व म्हशीच्या दुधाला किमान ६० रुपये प्रतिलिटर इतका दर मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे. यात आज सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी तासगाव तहसील कार्यालयावर जनावरांसह धडक मोर्चा नेला. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रास्ता अडवत शेतकऱ्यांनी मुंडन केले.  

सांगली : सांगलीच्या तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने (Sangli) जनावरांच्या सहित धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. गाईच्या दुधाला ४० रुपये, म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव मिळावा, आणि शेतकऱ्याला अनुदान देण्यापेक्षा थेट दर (Milk Price) वाढवून द्यावा. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे, मोफत विमा सुद्धा मिळावा; यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या तासगाव येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

कोल्हार घोटी राज्यमार्ग अडवत केले मुंडण

अहमदनगर : राज्य सरकारने दूध दराची घोषणा केल्यानंतरही दूध उत्पादक आक्रमक आहेत. दुधाला किमान ४० रुपये हमीभाव मिळावा. या मागणीसाठी अकोले तालुक्यातील कळस गावात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर बैलगाडी घेऊन आणि शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. तर काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडण करत सरकारपर्यंत आपला आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते अजित नवले आणि अजित काळे हे देखील आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलकांनी कोल्हार घोटी महामार्ग अडवून धरला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी, पदभार स्वीकारला

Ladki Bahin Yojana : 410 कोटींचा निधी मंजूर, 'लाडकी'ची दिवाळी गोड होणार? सप्टेंबरचा हप्ता मिळणार

SCROLL FOR NEXT