Sangli : मिरज दंगल प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता. File Photo
महाराष्ट्र

Sangli : मिरज दंगल प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता, पहा Video

मिरज शहरामध्ये २००९ साली झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : मिरज शहरामध्ये २००९ साली झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. त्यांनतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत उमटले होते. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने हा खटला निकाली काढत निर्दोष यातील आरोपींची मुक्तता केली आहे.

मिरज शहरा मध्ये २००९ साली गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरा मध्ये अफजलखान वधाचा फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुरानंतर मिरज शहरामध्ये धार्मिक व जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होतं. या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. पंधरा दिवस मिरज-सांगली शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होत. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी सांगितली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT