Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sangamner News: कल्‍पना चावलाला रोल मॉडेल ठेवत श्रद्धाची भरारी; युरोपियन स्पेस एजन्सीत निवड झालेली एकमेव भारतीय

कल्‍पना चावलाला रोल मॉडेल ठेवत श्रद्धाची भरारी; युरोपियन स्पेस एजन्सीत निवड झालेली एकमेव भारतीय

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

संगमनेर (अहमदनगर) : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याच्या (Farmer) मुलीने साता समुद्रापार भरारी घेतली असून खांडगाव येथील श्रद्धा गुंजाळ हिला युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये जगभरातून निवडलेल्या सहा (Sangamner) जणांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व  करण्याची संधी मिळाली आहे. भारतातून निवड झालेली श्रद्धा ही एकमेव भारतीय ठरली आहे. (Breaking Marathi News)

बालपणापासूनच अंतराळाबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण असलेल्या श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. घरात मार्गदर्शन करणारे कोणी नसल्याने अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक माहिती वृत्तपत्रे आणि इंटरनेटच्या माध्यमातून जमवून तिने माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतले. स्वप्न पूर्तीचा पुढचा टप्पा सर्वच पातळ्यांवर कठीण होता. आर्थिक परिस्थिती बेताची त्यात शिक्षणासाठी इतका खर्च करून बाहेर कशाला पाठवायचे. तिच्या कमाईचा तुम्हाला काय उपयोग, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पचवून आई-वडिलांनी ठाम भूमिका घेतली आणि मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. श्रद्धाने मिळवलेल्या यशाने आई– वडील आंनदी झाले असून आपल्या मुलीने देशाची सेवा करावी; अशा भावना श्राद्धाच्या आईने व्यक्त केली आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनेही सन्‍मान

श्रद्धाने बालपणापासूनच कल्पना चावलाला रोल मॉडेल ठेवत ध्येयाकडे वाटचाल सुरू केली होती. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉईड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत तिने पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक ॲस्ट्रॉईड शोधला. त्याला २०२० पीआर १३ नावही देण्यात आले. या संशोधनाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि डॉ. अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस हे दोन सन्मान तिला मिळाले आहे. यातूनच 'नासा'च्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅमसाठी केनेडी स्पेस सेंटर येथे तिची निवड झाली होती. नासानंतर श्रद्धा थेट युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

सिम्युलेटर्सवर काम करायची संधी

युरोपियन स्पेस एजन्सीसाठी (ESA) पोलंडमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी श्रद्धाची निवड झाली असून इटली, स्वित्झरलँड, जर्मनी, यूएसए, रशिया आणि भारत या सहा देशांचा यात समावेश आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाणाऱ्या यानांचा अभ्यास वाहिनी त्यातील सिम्युलेटर्सवर काम करायची संधी तिला मिळणार आहे. तिच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT