Shirdi News: शिर्डीत उभे राहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल; मराठी माध्यमात मुलींना मोफत शिक्षण

शिर्डीत उभे राहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल; मराठी माध्यमात मुलींना मोफत शिक्षण
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : साई संस्थानने शिर्डीत तब्बल १४ एकर जागेवर २०८ कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल (Shirdi) उभारले आहे. या शैक्षणिक संकुलात केजीपासून तर थेट पीजीपर्यंत ग्रामणी भागातील ७ हजार विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण (Education) घेता येणार आहे. (Maharashtra News)

Shirdi News
Bribe Trap: वीज मीटर लावण्यासाठी दीड हजाराची लाच; टेक्नीशीयनसह खासगी पंटर ताब्‍यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर २०१८ ला या संकुलाची पायाभरणी केली होती. त्यानंतर अवघ्या ५ वर्षात हे शैक्षणिक संकुल पूर्णत्वास आले आहे. साई संस्थानने उभारलेल्या या शैक्षणिक संकुलात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेस ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज असणार आहे. प्रधानमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने लोकार्पण रखडल्याची चर्चा असून हे शैक्षणिक संकुल याच शैक्षणिक वर्षात सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे.

Shirdi News
Pandharpur News: खडकाळ माळरानावर पिकविले आंबे; सहा एकरातून १ कोटीचे उत्पन्न

संकुलात या आहेत सुविधा

डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आर्टरूम, प्रशस्त वाचनालय, भोजन कक्ष, १ हजार ५० क्षमतेचे वातानुकूलित ऑडिटोरियम, क्रीडा संकुल, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, जिम, बँडमिंटन, टेबल टेनिस कक्ष या सुविधा साई संस्थानच्या या शैक्षणिक संकुलात उभारण्यात आल्या आहेत. मुलींसाठी मराठी माध्यमाची स्वतंत्र कन्या शाळा असून तेथे मुलींसाठी मोफत शिक्षण, इंग्रजी माध्यमात नाममात्र शुल्क तर इतर विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात शिक्षण दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com