Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sangamner News : तुम्ही ४० वर्षे काही केले नाही, आता तरी काम करू द्या; राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Sangamner Ahilyanagar News : शेतकऱ्यांना संबोधित करताना मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत निशाणा साधला

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र त्यांना जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. पण खऱ्या अर्थाने ४० वर्षानंतर दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहचले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. 

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त तीगाव परिसरातील १८ गावांमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. जलपूजनासाठी पोहचलेल्या जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांची बैलगाडीतून मिरवणुक काढून भव्य पुष्पहार घालून नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत निशाणा साधला.

एकही गाव वंचित राहू देणार नाही 

अमोल खताळ यांच्या रूपाने झालेले रूपांतर संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहे. चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. आम्ही लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. पाणी आम्हीच आणले आणि कॅनॉल आम्हीच पूर्ण करणार. 

पूर्वी केवळ क्रेशर व वाळूवाले फिरायचे 

जलसंपदा खाते माझ्याकडेच असल्याने तुम्ही चिंता करू नका, कारण मी जे बोलतो ते करतो. अमोल खताळ नवीन आमदार असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यांनी ४० वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या. संगमनेर मतदार संघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरत आहे, लोकांना भेटताय. पूर्वी संगमनेरमध्ये फक्त क्रेशर वाले आणि वाळू वाले फिरायचे. ठेकेदारांनी गावं वाटून घेतली होती. त्यामुळे आपण आता लोकांमध्ये राहणारा आमदार दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेस पक्ष करणार मंथन

Mantralaya Ceiling Collapsed: मंत्री कॅबिनेट बैठकीत बिझी असतानाच मंत्रालयात छत कोसळलं, नेमकं काय घडलं, पाहा | VIDEO

Sevai Pulao Recipe : रोजचा डाळ-भात खाऊन कंटाळलात? जेवणाला खास बनवा चमचमीत शेवयाचा पुलाव

Raksha Bandhan Saree Gift: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या बहिणीला भेट द्या ही सुंदर साडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीने गोर-गरिबांचा 'आनंद' हिरावला; गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

SCROLL FOR NEXT