sangamner apmc election result, balasaheb thorat, radhakrishna vikhe patil saam tv
महाराष्ट्र

Sangamner Market Committee Election Results : संगमनेर बाजार समितीत बाळासाहेब थाेरात, राधाकृष्ण विखे-पाटील गटास धक्का; अपक्ष उमेदवार विजयी

शेतक-यांनी अपक्ष उमेदवारावर दाखविला विश्वास.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Sangamner Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : संगमनेर कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (radhakrishna vikhe patil) आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थाेरात (balasaheb thorat) यांच्या गटाला धक्का देत एक अपक्ष उमेदवारने बाजी मारली आहे. हमाल मापाडी संघात सचिन कर्पे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. (Breaking Marathi News)

नगर (Ahmednagar APMC Result) जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीचा आज (शनिवार) निकाल लागणार आहे. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची आजतागायत एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर बाजार समितीत विखे पाटलांनी थोरातांना आव्हान दिलेले आहे. या बाजार समितीत सत्तांतर होणार का ? याची उत्सुकता जिल्ह्यात लागून राहिली आहे.

दरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंत महाविकास आघाडीने 18 पैकी सात जागांवर यश मिळविले हाेते. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने दाेन्ही मातब्बर नेत्यांच्या गटाला धक्का देत विजय मिळविला आहे.

हमाल मापाडी संघात अपक्ष उमेदवार सचिन कर्पे यांनी विजय मिळविला आहे. त्यांना 147 पैकी 90 मते मिळाली आहेत. थोरात आणि विखेंच्या लढतीत अपक्षाची बाजी मारल्याने सचिन कर्पेंची जिल्ह्यात जाेरदार चर्चा सुरु आहे. कर्पे यांनी निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT