radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, sangamner apmc election saam tv
महाराष्ट्र

Sangamner Market Committee Election Results : हाेमपीचवर बाळासाहेब थाेरात चॅम्पियन, महसूलमंत्र्यांच्या हाती भाेपळा; संगमनेरात जल्लाेष सुरु

या निकालामुळे थाेरातांचे वर्चस्व सिद्ध झाले.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Sangamner Krushi Utpanna Bazar Samiti Result : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थाेरात (balasaheb thorat) यांच्या गटाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्या गटाचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत विखे-पाटील गटाला एक जागाही मिळवता आली नाही तर थाेरातांच्या गटाने सर्वच्या सर्व 18 जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. (Breaking Marathi News)

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची आजतागायत एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर बाजार समितीच्या निवडणूकीत विखे पाटलांनी थोरातांना आव्हान दिले हाेते. त्यामुळे यंदा नगर (Ahmednagar APMC Result) जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काय लागताे याची आज (शनिवार) उत्सुकता जिल्ह्याला लागून राहिली हाेती.

एकेक मतदारसंघातील निकाल हाती येऊ लागल्यानंतर बाजार समिती बाळासाहेब थाेरात यांच्याच ताब्यात राहणार असल्याचे चित्र स्पष्ट हाेत हाेते. दरम्यानच्या काळात एका अपक्ष उमेदवाराने दाेन्ही पॅनेलला दणका देत विजय मिळविला. त्यामुळे पुढील निकाल काय लागतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे डाेळे आणि कान लागले हाेते.

दुपारी अडीचच्या सुमारास संगमनेर बाजार समितीवर यंदा देखील बाळासाहेब थोरातांचीच सत्ता राहिल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व 18 जागांवर थोरात गटाने निवडणूकीत विजय मिळविला. विखे पाटलांच्या गटास खातेही उघडता आले नाही. या निकालवरुन संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी असल्याचे दिसून आले. संगमनेर बाजार समितीवर थोरातांचा झेंडा फडकातच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT