मिरज-पंढरपूर रस्त्यावर रोडरॉबरी!; मारहाण करत लुटले 3 लाख रुपये Saam Tv
महाराष्ट्र

मिरज-पंढरपूर रस्त्यावर रोडरॉबरी!; मारहाण करत लुटले 3 लाख रुपये

4 अज्ञातांनी पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत तीन लाख रुपये लुटले आहेत.

विजय पाटील

सांगलीच्या मिरज- पंढरपूर (Sangali Miraj-Pandharpur Highway) मार्गावर काल सायंकाळी 6 ते 9 च्या दरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव जवळ जबरी रोडरॉबरी करण्यात आली आहे. 4 अज्ञातांनी पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत तीन लाख रुपये लुटले आहेत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली आहे.

गणेश साबू मादीकर सांगली हे मंगळवारी त्यांची स्विफ्ट गाडी मधून त्याचे चालक राजाराम शिंदे यांच्यासह संगलीकडे घरी निघाले होते. याच वेळी ते नरसिंहगाव येथे मिरज पंढरपूर रस्त्यांवर ते सायंकाळी सव्वासहा ते 9 च्या दरम्यान आले असता अज्ञात 4 तरुण मास्क लावून दोन मोटरसायकल वरून आले.

त्यांनी गाडी अडवून, चालक राजाराम शिंदे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आणि स्विफ्ट मध्ये बसून पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत नागज, आरेवाडी, नांगोळे, रंजणी, खिळेगाव, सलगरे, मार्गे आरग -बेडग रस्त्यावर निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्या ठिकाणी मारहाण करीत तीन लाख एक हजार रुपये रोख असणारी रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. हे मास्क लावलेले चोरटे तरुण 25 ते 30 वर्ष वयाचे होते. अशी फिर्याद गणेश साबू मादीकर यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT