सागंलीत अकरा घरफोड्या करणारे चोरटे गजाआड; सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
सागंलीत अकरा घरफोड्या करणारे चोरटे गजाआड; सहा लाखाचा मुद्देमाल जप्त Saam TV
महाराष्ट्र

सागंलीत अकरा घरफोड्या करणारे चोरटे गजाआड; सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

विजय पाटील

सांगली : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. जिजा काळे आणि अनुशेठ भोसले अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल 18 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा तब्बल सहा लाख चोवीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तासगाव शहरात (Tasgoan City) सराईत गुन्हेगाराची हजेरी घेत असताना जिजा काळे यांच्याबद्दल माहिती मिळाली. तो कवठेएकंद येथे स्मशानभूमी जवळ सोन्याच्या पिशवीसह आढळून आला.

त्याच्याकडून कसून माहिती घेतली असता एका साथीदाराच्या सहाय्याने वेगवेगल्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. सांगली शहर (Sangali) पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत सहा तर इस्लामपूर दोन, तासगाव एक आणि संजयनगर हद्दीत 2 अश्या अकरा चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यातील सोन्याचे दागिने पैसे जप्त केले आहेत. या सराईत चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना थरारक पाठलाग करावा लागला आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी सुद्धा झाला आहे. तर या दोन्ही चोरट्यांच्या साथीदारांना शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT