Sangali Crime news Saam Tv
महाराष्ट्र

दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; सांगलीत एकाची निर्घृण हत्या

विजय पाटील

सांगली : दारू पिऊन शिव्या दिल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी तसेच उसाच्या दांडक्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत युवकाचा जागीच (Death) मृत्यू झाला. सांगलीच्या (Sangali) वाळवा तालुक्यातील वाटेगाव परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे वाटेगाव परिसर हादरून गेला आहे. प्रवीण प्रकाश साळुंखे (वय ३२) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणात कासेगाव पोलिसांनी (Police) दोन जणांना अटक केली आहे. (Sangali Latest Crime News)

गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण (वय ३२) मोहन उर्फ बाळ्या चव्हाण (वय २४) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. मृत प्रवीण याचे वडील प्रकाश साळुंखे यांनी कासेगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (३० मे) वाटेगाव येथील एका दारूच्या दुकानात रात्री साडेआठच्या सुमारास गणेश चव्हाण, मोहन चव्हाण व मयत प्रवीण साळुंखे हे तिघे मित्र दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पीत असताना बोलता-बोलता एकमेकांच्या मध्ये शिवीगाळ सुरू झाली.

यावेळी शिव्या दिल्याच्या कारणावरून आरोपी गणेश आणि मोहन यांनी प्रवीणला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मयत प्रवीण याला दुकानातून बाहेर काढून वाटेगाव येथील भाटवाडीकडे जाणाऱ्या घोगावती ओढ्याच्या पात्रात नेत उसाच्या दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी गणेश व मोहन हे दोघे फरार झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत प्रवीणचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी घटनेतील संशयित आरोपीला अटक केली. मयत प्रवीण हा दारूच्या आहारी गेला होता. तर मोहन आणि गणेश हे पण व्यसनाधीन आहेत. या हत्याकांडामुळे वाटेगाव परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT