सावधान! मुंबईत कोरोना पुन्हा वाढतोय; कशी आहे प्रशासनाची तयारी?, जाणून घ्या

मुंबईत अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
Mumbai Corona Update
Mumbai Corona UpdateSaam TV

मुंबई : कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरल्यानंतर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ५०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील ३०० रुग्ण एकट्या मुंबईतील (Mumbai Corona) आहेत. मुंबईत मागील दीड ते दोन महिन्यांपासून १०० च्या खाली असलेला कोरोना रुग्णसंख्येचा आकडा आता ३०० च्या पार गेली आहे. मुंबईत अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. (Mumbai Corona Latest Updates)

Mumbai Corona Update
सर्वसामान्यांना दिलासा! LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर

मंगळवारी मुंबईत कोरोनाचे तब्बल 506 नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत तब्बल १० लाख ६५ हजार ८०२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आतापर्यंत १०,४३,७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे ९८ टक्क्यांवर आहे.

मुंबईत सध्या २ हजार ५२६ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बधितांची संख्या केवळ ९० इतकेच आहेत, या ९० पैकी ६ रुग्ण अत्यवस्थ आहेत . सध्या मुंबईत ९० रुग्णशय्येवर केवळ रुग्ण उपचार घेत असून , २४ हजार ४७२ रुग्णशय्या उपलब्ध आहेत . या आकडेवरी नुसार केवळ ०.३७% रुग्णशय्येवर रुग्ण उपचार घेत असून उर्वरित रुग्णशय्या मोकळ्या आहेत .

Mumbai Corona Update
राज्यात इंधनाचा तुटवडा; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या घटल्यामुळे प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले , याचवेळी कोरोनाची अनावश्यक व्यवस्था देखील बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. बंद करण्यात आलेली यंत्रणा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती . गरज पडल्यास ही यंत्रणा युद्ध पातळीवर सुरु करण्यात येणार आहे . यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे जम्बो कोविड केंद्र , हे जम्बो कोविड केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत .

दरम्यान गरजेनुसार हे जम्बो कोविड केंद्र तात्काळ पुन्हा सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे आता रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास जम्बो कोविड केंद्र आणि इतर प्रभाग पातळीवरील कोविड उपचार केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com