Sangali Crime Saamtv
महाराष्ट्र

Sangli Crime News: अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा; प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच घेतला चिमुकल्याचा जीव

Crime News Update: या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचाही बनाव निर्दयी मातेने केला होता.

विजय पाटील

Sangali News: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता.

मात्र एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात निर्दयी मातेसह प्रियकर विटा पोलिसांच्या ताब्यात आहेत. (Sangali Khanapur Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच विहरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील (Sangali) लेंगरे गावात घडला आहे. मुलाची आई ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. (Latest Marathi News)

त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. तक्रार दाखल झाल्यानंतर विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.

दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली.. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. सध्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT