sandesh butala, accident at mumbai goa highway, khed, verul saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात खेडच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई-गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) वेरळ फाट्यानाजीक पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात (accident) एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवार0 सकाळच्या सुमारास खेड येथील वेरळ येथे झाला. (Ratnagiri Latest Marathi News)

या अपघातात खेड येथील संदेश सुरेश बुटाला यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर 108 रुग्णवाहिकेचे चालक बावा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. (Maharashtra News)

दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीला धडक देऊन पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाला लोटे एमयडीसीच्या आसपास पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT