Sangli, Sangli Crime News,
Sangli, Sangli Crime News, saam tv

Sangli : आईनं दाेन मुलांसह संपवलं जीवन; प्रेम प्रकरणाचा झाला शेवट

जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल हाेती.
Published on

Sangli Crime News : सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर येथे मातेने (mother) आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. नऊ महिन्याच्या लहान मुलाचा मृतदेह रात्री नऊ वाजता पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने त्यास बाहेर काढून रात्री जत ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी आणण्यात आला. त्यानंतर सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. लक्ष्मी धनेश माडग्याळ (वय 23), दिव्या धनेश माडग्याळ (दोन वर्ष) व नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. (sangli latest marathi news)

जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिचे भगवान येथील एका तरुणाशी विवाह ठरला होता मात्र तिला पसंत नसल्याने गावातीलच धनेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर लग्न केले. धनेश माडग्याळ यांच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केले होते. त्यावेळी जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होती. (Breaking Marathi News)

Sangli, Sangli Crime News,
Sangli Crime News : पगार न मिळाल्याने कामगारानं दुकानातील लाखाे रुपयांची तिजाेरीच नेली उचलून अन्...

तिचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत गावी येऊन सिंदूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर स्वतःच्या शेतात राहत होते. तिला एक मुलगी व एक मुलगा आहे. प्रेम प्रकरणातून प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती. (Tajya Batmya)

Sangli, Sangli Crime News,
Love jihad : श्रीरामपुरातील मुल्ला कटर टाेळीवर मोक्का; लव जिहाद प्रकरण भाेवलं

या वादातून त्यांचे सारखे खटके व भांडण होत होते. यातूनच तिने आत्महत्येचे मोठे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात सुरू होती. आत्महत्या नंतर लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

Sangli, Sangli Crime News,
Satara: पोलीस दलाला काळिंमा फासणारी घटना; महाविद्यालयीन तरुणीची पोलिसाकडून छेडछाड

दोघांचे मृतदेह सांगोल्याच्या पथकाला बोलावून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी रविवारी रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात आणला. जत पोलीस ठाण्यात मात्र मयत नोंद झाली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याघटनेमुळे सिंदूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com