Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

Crime: परळीत चंदन तस्कर 'पुष्पा' ला पोलिसांनी केली अटक

बीडच्या परळी तालुक्यात चंदनाची तस्करी करणाऱ्या 'पुष्पा'ला चंदनासह पकडत, बेड्या ठोकण्यात आल्या आहेत

विनोद जिरे

बीड: बीडच्या परळी तालुक्यात चंदनाची तस्करी करणाऱ्या 'पुष्पा'ला चंदनासह पकडत, बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई परळी (Parli) ग्रामीण पोलिसांनी केली आहे. परळी तालुक्यातील तळेगाव, नागापूर या गावच्या (village) शिवारात, चंदन तस्कर चंदनाची झाडे तोडून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. परळी ग्रामीण पोलिसांना (police) हि माहिती मिळाली होती.

हे देखील पहा-

या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी कर्मचार्यांसह शोध असता, चंदनाची झाडे कापलेली आढळली. या कापलेल्या झाडाची साल वेगळी करून, शुद्ध चंदन विक्रीसाठी तयार केल्याचं पोलिसांना पाहायला मिळाले आहे. दरम्यान, यावेळी शुद्ध १२ किलो चंदन (sandalwood), झाडे साफ करण्याच्या ५ वाकस, १ तराजू आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तस्करी करणाऱ्या पुष्पाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : देवाच्या भक्तीत मग्न व्हाल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

कोयना धरणात फिरतायत महाकाय अजगर? भल्या मोठ्या अजगरांमुळे दहशत?

'कोरियन लव्ह गेम'चा जीवघेणा विळखा, तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

महायुतीत वादाची ठिणगी, तुमचा मुख्यमंत्री 242 आमदारांमुळे

SCROLL FOR NEXT