Samruddhi Mahamarg News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धीचा मार्ग का झालाय मृत्यूचा सापळा; अपघाताची कारणे आली समोर

Samruddhi Mahamarg News: या अपघातात २६ प्रवाशांना आगीत होरपळून आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

Ruchika Jadhav

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. शुक्रवारी झालेला बस अपघात हा सर्वाधिक भीषण होता. या अपघातात २६ प्रवाशांना आगीत होरपळून आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. (Latest Marathi News)

प्रवाशी रात्री गाढ झोपेत असताना बुलढाणा येथे अचानक बस उलटली. बस उलटताच तिने पेट घेतला. त्यानंतर वाहन चालक यातून बाहेर पडला त्याने इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात बसने मोठा पेट घेतला. यात प्रवाशींचा होरपळून मृत्यू झाला.

अपघाताच्या वारंवार घडत असलेल्या या घटना पाहता सातत्याने समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहे? त्याची नेमकी कारणे काय आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे.

समृद्धीचा मार्ग का झालाय मृत्यूचा सापळा

अपघाताच्या घटनानंतर एका संशोधनातून अपघाताची कारणे शोधण्यात आली आहेत. समृद्धीवरील अपघातासाठी महामार्ग संमोहन जबाबदार असल्याचा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

संमोहन म्हणजे नेमकं काय होतं?

महामार्गावर वाहन चालवताना अनेक मिनीटे वाहन सरळ एकाच दिशेने जात असते. यामध्ये कोणताही अडथळा येत नाही असे वाटते. डोळ्यांना सतत तसेच दिसत असल्याने समोर अडथळा आला तरी वाहन चालकाला ते समजत नाही. त्यातून बाहेर येण्यासाठी वाहन चालकाला काही सेकंदाचा वेळही मिळत नाही. वेग जास्त असल्याने अपघात होतो.

अनेक चालक समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) संमोहनाचे बळी ठरलेत. महामार्ग संमोहन ३३ टक्के अपघाताला कारणीभूत असल्याचं समजलं आहे. लेन कटिंग हे देखील एक मुख्य कारण आहे. आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जाताना योग्य ती काळजी घेत त्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. तसे न केल्याने लेन बदलणारी व्यक्ती दुसऱ्या लेनवर जाते तेव्हा त्या लेनवरील मागून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात. ५१ टक्के ट्रक चालक लेन ओलांडण्याचे नियम पाळत नाहीत.

संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, आतापर्यंत साईड डॅशमुळे ४० टक्के अपघात झालेत. ३० टक्के छोटी आणि २० टक्के छोटी मालवाहू वाहने वेग मर्यादा ओलांडत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ३४ टक्के अपघात कमकुवत टायर वापरल्याने झालेत. तर मोबाईलचा वापर केल्याने ८ टक्के अपघात झाल्याचे संशोधनात समोर आले आहे.

संमोहन टाळण्यासाठी काय करावे?

संमोहन होऊन अपघात होऊनयेत यासाठी आपण स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. यासाठी वाहन चालवताना आपण स्वत:हून एक तासाने ब्रेक घेतला पाहिजे. वाहन थांबवून डोळ्यांवर थंड पाण्याचा हपका मारावा. त्याने तुम्ही स्वत:ला संमोहनातून बाहेर काढू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT