Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg  Saam TV News
महाराष्ट्र

Samruddhi Expressway : मुंबई-नागपूर अंतर ८ तासांनी कमी होणार, समृद्धी महामार्गाबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ५ जून २०२५ पासून पूर्णतः सुरू होणार. प्रवास वेळ आता फक्त ८ तास. टोल दर, मार्ग, गतीमर्यादा, पर्यटनस्थळे, सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाची माहिती एकत्र पहा.

Namdeo Kumbhar

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway मुंबई ते नागपूर हा ७०१ किमीचा प्रवास आता फक्त ८ तासांत शक्य होणार आहे. कारण, ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ ५ जून २०२५ पासून पूर्णपणे सुरू होणार आहे. इगतपुरी-आमणे या अखेरच्या टप्प्याचे काम १०० टक्के पूर्ण झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई (Mumbai-Nagpur Expressway) या प्रवासाचा वेळ तब्बल ८ तास वाचणार आहे. याआधी या प्रवासासाठी १६ ते १८ तास लागत होते. या महामार्गामुळे प्रवास आरामदायी तर होणार आहेच, त्याशिवाय वेळही वाचणार आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात.

७०१ किमी, नागपूर ते मुंबई अंतर फक्त ८ तासांत शक्य ?

एकूण १२० मीटर रुंदीचा सहापदरी समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा आहे. १० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना जोडलं जाईल. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासांत कापणे शक्य होणार आहे. या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग(डिझाईन स्पीड) ताशी १५० किमी इतका असेल. महामार्गालगत १९ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची लागवड होणार आहे.

समृद्धी महामार्गावर किती उड्डाणपूल अन् छोटे पूल, बोगदे आहेत ?

महामार्गाच्या प्रत्येकी पाच किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा असेल. समृद्धी महामार्गात अत्याधुनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करुन विविध संरचनेचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, ८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, ६ बोगदे, १८९ भूयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भूयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भूयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ३ भूयारी मार्ग आणि ३ उन्नत मार्गाचा समावेश असेल. समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, सुधारीत पथदिवे, आणि डिजिटल संकेत (सिग्नल) यांचा वापर करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाला कोणती पर्यटनस्थळे जोडणार ?- Which tourist destinations will be connected to the Samruddhi Highway ?

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे.समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते (इंटरचेंज) यामुळे राज्यातील अनेक पर्यटनस्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटनस्थळे जवळ येणार आहेत.

समृद्धी महामार्गाशी कोणती शहरे जोडलेली आहेत? Which cities are connected to Samruddhi Mahamarg?

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग १० जिल्ह्यांना जोडणार आहे. ७०१ किमीच्या महामार्गामुळे २६ तालुके जोडले जाणार आहेत. ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून जातो.

What is the entry and exit point of Samruddhi Mahamarg?

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्ग, मंब्रा, ठाणे.

ठाणे: ठाणे जवळ, मुंबईच्या पूर्व उपनगरांना, कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा.

नाशिक: नाशिक जवळ, शहर आणि नाशिक रोडला जोडणारा.

औरंगाबाद: औरंगाबाद जवळ, शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा.

जालना: जालना जवळ, शहर आणि आसपासच्या क्षेत्रांना जोडणारा.

नागपूर: नागपूरच्या वाहतूक जालाशी समाकलित.

अकोला: शहर आणि आसपासच्या क्षेत्रांना जोडणारा.

इतर महत्त्वाचे जोडणी बिंदू Other notable connections:

भिवंडी, कल्याण, इगतपुरी, कोपरगाव, शिर्डी, औरंगाबाद लेणी, मेहकर, धामणगाव, बुट्टोबोरी पॉवर प्लांट.

प्रमुख इंटरचेंजेस : Interchanges

खालापूर, किवळे, उर्से, तळेगाव, चाकण आणि इतर अनेक.

समृद्धी महामार्ग सुरक्षित आहे का ? Is the Samruddhi Highway safe?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा आधुनिक आणि नियोजित पायाभूत प्रकल्प आहे. पण तरीही त्याच्या सुरक्षिततेबाबत काही प्रश्न आणि चिंता उपस्थित करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रशासनाने त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली, तरी प्रवाशांनी वेगमर्यादा, वाहनाची स्थिती आणि रस्त्यावरील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा किती आहे? What is the speed limit on Samruddhi Mahamarg?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून १२० ते १५० किमी वेगाने गाडी चालवता येऊ शकते. घाटात किमान 80 किमी/तास आणि समतल भागात कमाल 120 ते 150 किमी/तास वेगमर्यादा आहे. दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी रिक्षांना प्रवेशबंदी आहे, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो

समृद्धी महामार्गावर किती टोलनाके आहेत ?

मुंबई-नागपूर महामार्गावर ३१ टोलनाके आहेत. नागपूर-शिर्डी या टप्प्यात १८ टोलनाके कार्यरत आहेत. वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगाव, गावनेर तळेगाव, कारंजा लाड, शेलू बाजार, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव-जांबरगाव, कोकमठान या ठिकाणी महामार्गावर टोल नाके आहेत.

What is the toll rate per km in samruddhi?

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर १ एप्रिल २०२५ पासून टोल दरात १९ टक्केवाढ लागू करण्यात आली आहे. हे दर ३१ मार्च २०२८ पर्यंत कायम राहतील.

चारचाकी वाहने (कार, जीप, व्हॅन): १४४० रुपये

हलकी, व्यावसायिक, मिनी बस - २०७५ रूपये.

बस किंवा ट्रकसाठी - ३६५५ रुपये

अति अवजड वाहनांसाठी - ६९८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

Smartphone Repairing Tips: फोन दुरुस्तीला देताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Honey Trap: हनीट्रॅपवाले मंत्री कोण? महाजन-लोढांचा फोटो राऊतांकडून ट्वीट

SCROLL FOR NEXT