शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

Fact Check: शिर्डीत एका झाडावर साईबाबा दिसल्याचा दावा करण्यात आलाय...साईंचा चेहरा दिसत असल्याचा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली...पण, खरंच झाडावर साईंची प्रतिमा दिसली का...?
Crowd gathers near the sacred tree in Shirdi after a viral message claimed that Saibaba’s face appeared on it
Crowd gathers near the sacred tree in Shirdi after a viral message claimed that Saibaba’s face appeared on itSaam Tv
Published On

हाच व्हिडिओ व्हायरल झाला आणि कल्पवृक्षावर साईबाबा अतरले असा मेसेज पसरला...साईबाबा दिसले, चमत्कार झाला, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली...आणि बघता बघता, कल्पवृक्षाजवळ गर्दी झाली...भक्त फोटो काढून दर्शन घेऊ लागले...

साईबाबा हयात असताना ते शिर्डीहून राहाता गावामध्ये येत असताना साकुरी येथील याच वृक्षाखाली थांबायचे, असा साई चरित्रात उल्लेख आहे...त्यामुळे आजही शिर्डीला येणारे अनेक साईभक्त इथे दर्शनासाठी येत असतात...हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी इथे येऊन दर्शन घेतलं...हा भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी खरंच कल्पवृक्षावर साईबाबा दिसतायत का हे जाऊन पाहिलं...आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे शिर्डीत पोहोचले आणि नक्की काय घडलं हे जाणून घेतलं...

ही झाली भक्तांची भावना...पण, हे नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्या टीमने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला...आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती

शिर्डीत साईंची प्रतिमा दिसल्याची अफवा

साकुरीतील घटना दृष्टीभ्रमाचे उदाहरण

स्ट्रीटलाईट्समुळे झाडावर साईबाबा दिसल्याचा भास

चमत्कार होत नसतात...अशा प्रकारचे वर्तन जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे... शिर्डीत कल्पवृक्षावर साईबाबा दिसले ही अफवा असून, प्रतिमा दिसल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com