Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : अतिवेग जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १ जखमी

Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Samruddhi Mahamarg Accident News : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे. एकीकडे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गांधीगिरी सुरू केली असताना, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. (Breaking Marathi News)

शिर्डीहुन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अतिवेगाने शिर्डी (Shirdi) कडून संभाजीनगरकडे येथे जात असतांना मागील उजव्या बाजूचे टायर हे तुटून बाजूला गेल्या गाडीवरील ताबा सुटला आणि कार पलटी झाली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये एकूम ३ जण होते.

यात तीन जणांपैकी २ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ ॲम्बुलन्स मध्ये औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे. सुर्यकांत वडणे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे तर अनिज शेख आणि प्रतीक देशमुख अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही. समृद्धी महामार्ग अपघाताचा सापळा ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

SCROLL FOR NEXT