Mumbai Crime News: अंधेरीत ज्योतिष महिलेकडून उच्चभ्रू सोसायटीत वेश्याव्यवसाय, तीन आरोपींना अटक

Mumbai Crime News: एक मॉडेल तरुणीसह तीन महिलांची सुटका केली आहे.
Amboli Police Station
Amboli Police StationSaam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai News : अॅस्ट्रोलॉजर (ज्योतिषी) महिला एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार सुरु होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

उच्चभ्रु सोसायटीत चालू असलेल्या वेश्‍या व्यवसायाच्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. संबंधिक ठिकाणाहून पोलिसांनी तीन महिला दलालांना अटक केली. तर एक मॉडेल तरुणीसह तीन महिलांची सुटका केली आहे.

Amboli Police Station
Satara Accident News: एसटी बस-बाईकमध्ये भीषण अपघात, पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू

सुनिता ललीतेश झा (६५ वर्षे), मधू उर्फ मॅडी रिकार्डो स्मीत (६४ वर्षे) आणि ट्विंकल ललीतेश झा (३१ वर्षे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील शास्त्रीनगर लिंक रोड परिसरातील रविराज ओबेरॉय कॉम्प्लेक्स मधील फेअर बिल्डिंग, 'अ' विंग, मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 405 मध्ये व्यवसायाने एस्ट्रॉलॉजर असलेली महिला वेश्यागमनाकरीता मॉडेल मुली, महिला यांना बंद करून जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची विश्वसनीय माहिती अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, अंमलबजावणी, गुन्हे शाखा, गु.अ.वि. मुंबई यांना मिळाली होती. (Latest MArathi News)

Amboli Police Station
CNG-PNG Prices News : सीएनजी-पीएनजीच्या किमती कमी होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार 5 एप्रिल रोजी अंमलबजावणी शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता कदम व पोलीस पथकाने छापा कारवाई करून मॉडेल तरुणीसह ३ महिलांची देहविक्रीतून सुटका केली. यानंतर सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना कांदिवली सुधारगृह येथे ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com