Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग २ दिवस ४ तासांसाठी बंद; वाचा कारण आणि पर्यायी मार्ग

Samruddhi Mahamarg block: वाहतूक आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधित वाहतूक सुरळीत सुरू असणार आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Samruddhi Mahamarg:

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक दोन दिवस बंद असणार आहे. पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, दोन्ही बाजूंची वाहतूक आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधित वाहतूक सुरळीत सुरू असणार आहे.

बंद कालावधित पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. आज आणि उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

जालना इंटरचेंज १४ ते सावंगी इंटरचेंज १६ दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज १४ मधून बाहेरपडून निघोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंद्रीज शाळेपर्यंत असेल. नंतर वाहणे उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज १६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना केली जातील.

समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतुकीत देखील बदल असणार आहे. सावंगी इंटरचेंज १६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडूनवर नमूद केलेल्या मार्गावरून (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज १४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Indian Student News : दिवाळी साजरी करताना धाडकन खाली कोसळला, दुबईत १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Bull Attack : दुचाकींचा पाठलाग करत मोकाट बैलाचा हल्ला; हल्ल्यात लहान मुलगा जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

वारंवार अन्न योग्यरित्या पचत नसेल तर काय करावं?

Satara: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसासह एका व्यक्तीविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT