Samruddhi Mahamarg accident today  साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg accident today : अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकला आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला. फुलकोबी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्यानंतर ही दुर्घटना घडली.

Namdeo Kumbhar

अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Samruddhi Mahamarg Accident, Amravati Truck Fire : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी दुर्दैवी अपघात घडला. धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. (Samruddhi Mahamarg truck fire near Amravati)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर १२७ जवळून हा ट्रक जात होता. हा ट्रक फुलकोबी (फ्लॉवर) घेऊन जात होता. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.

समृद्धी महामार्गावरून जात असताना अचानक ट्रकचा टायर मोठ्या आवाजासह फुटला. टायर फुटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला अचानक आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की ट्रकमध्ये बसलेल्या दोन जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ट्रकला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली अन् या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या फटाका अग्नीकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

UTI vs Diabetes : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

Onion And Garlic: नवरात्रीच्या उपवासाला कांदा- लसूण खावा की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT