Samruddhi Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर पुन्हा भीषण अपघात! ट्रक उलटून चालक जागीच ठार

Samruddhi Highway: या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून हा 'रस्ता संमोहन' चा बळी ठरत असल्याची चर्चा होत आहे.

Gangappa Pujari

संंजय जाधव, प्रतिनिधी...

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. महामार्गावरील अपघाताची आणखी एक घटना समोर आली असून यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हकर परिसरातील पिंप्री माळी नजीक हा अपघात घडला असून वाहन उलटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लहान मोठ्या अपघातांनीच गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज दुपारी मेहकर परिसरातील पिंप्री माळी नजीक झालेल्या या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे.

उत्तरप्रदेशमधील ( यूपी ५० बीपी ७१८१ क्रमाकाचे) मालवाहू आयषर वाहन नागपूरकडे जात होते. यावेळी चालकाला डुलकी लागल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामुळे चालक दिनेश तिवारी( ४५, राहणार आझमगड उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा 'रस्ता संमोहन' चा बळी असल्याची चर्चा होत आहे. (Samruddhi Highway News)

दरम्यान, आज सकाळी (३, जून) आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली होती. नगर कल्याण महामार्गावरील (nagar kalyan highway) धोत्रे येथे तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातस्थळी आज सकाळपासून अपघातग्रस्त वाहनं पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेऊ लागली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

SCROLL FOR NEXT