Samruddhi Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन ट्रक एकमेकांवर धडकताच घेतला पेट

Samruddhi Mahamarg Accident News:समृद्धी महामार्गावर दोन ट्रक एकमेकांना धडकल्याने मोठी आग लागली आहे.

Ruchika Jadhav

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. दर दोन दिवसांनी या महामार्गावर अपघात होताना दिसत आहेत. अशात आज देखील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर दोन ट्रक एकमेकांना धडकल्याने मोठी आग लागली आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात एक ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे ऑटोकाट प्रयत्न सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) मर्यादेपेक्षा जास्त स्पीडमध्ये वाहन चालवल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे नागपूरकडे जाणाऱ्या दोन लेन बंद करण्यात आल्यात. यामुळे अन्य मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे.

आज सकाळपासून अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. खोपोलीमध्ये मोटर सायकलचा भीषण अपघात झालाय. या अपघतात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. खोपोली पळसदरी दरम्यान हा अपघात झाला. मोटर सायकल अपघतामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. नीरा सुरेश ठोंबरे असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती सुरेश ठोंबरे हे देखील जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT