Accident News
Accident News  Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारला अपघात, ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, ४ जण जखमी

साम टिव्ही ब्युरो

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या महामार्गावर भीषण अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज, शनिवारी देखील भरधाव कारचा अपघात झाला. या अपघात ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकरजवळ भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरच्या दिशेना जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर (Accident) परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला. कांदा घेऊन जाताना हा भीषण अपघात झाला.

दरम्यान, या आधी देखील समृद्धीवर अनेक भीषण अपघात झाले असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. तर अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT