Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाढ झोपेतच डंपरने मजूरांना चिरडलं; १ ठार २ गंभीर

Dumper Crushed Workers: समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. एका डंपरने कामगारांना चिरडलं आहे.

Rohini Gudaghe

फैय्याज शेख, साम टीव्ही शहापूर

समृद्धी महामार्गावर काम करणारे काही कामगार रात्री झोपले त्यानंतर त्यातील एकाची सकाळच झाली नाही. कारण भरधाव डंपरने कामगारांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शहापूर तालुक्यात हा भीषण अपघात झाला आहे. काल संध्याकाळी (२६ मे रोजी) ही घटना घडली आहे. दोन्ही जखमी व्यक्तींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, शहापूर तालुक्यात कसारा विभागातील वाशळा गावानजीक समृद्धी महामार्गाचं अंतिम टप्प्याचं काम सुरू आहे. या मार्गावर काम करण्यासाठी (Samruddhi Mahamarg Accident) अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील काही कामगार काम करण्याकरीता या ठिकाणी आले आहेत. ते या रस्त्याच्या कडेलाच राहत असल्याचं समोर आलं आहे.

या कामगारांनी काल दिवसभर काम केलं (Dumper Crushed Workers) होतं. दिवसभर काम केल्यानं थकल्यानंतर २५ ते ३० कामगार संध्याकाळी काम आटपून समृद्धी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपले होते. परंतु झोपेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. गाढ झोपेत असताना समृद्धी महामार्गावर काम करणारा एक डंपर तेथे (Road Accident) आला अन् अंधारात त्याने या झोपलेल्या कामगारांना चिरडलं. या डंपरखाली तीन कामगार चिरडले गेले. यात एकजण ठार झाला आहे.

या अपघातामध्ये अशोक मोहीते (वय ५० वर्ष) यांचा जागीच मृत्यू झालाय. तर अंकुश मोहीते (वय २८ वर्ष) आणि सुमन पवार (वय ६० वर्ष) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आता या अपघातानंतर संबंधित यंत्रणा सतर्क झाली ( Accident News) आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस रूग्णालयाच्या आवारात तैनात करण्यात आले आहे. या कामगारांच्या मृत्यूने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्ग अपघातांसाठी चांगलाच ओळखला जातो, कारण या महामार्गावर नेहमीच अपघात होत असल्याचं समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुण्यात तोडफोडीचे सत्र कायम! सोसायटीमधील CCTV आणि वाहने फोडली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra Live News Update: दुपारी ४ वाजता आयोगाची पत्रकार परिषद

Actor Controversy: 'साडीत छान दिसतेस...'; अभिनेत्याला सोशल मीडियावर मॅसेज करणं पडलं माहागात, पोलिस तक्रार दाखल

Sonalee Kulkarni Photos: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज, बीचवर दिल्या स्टायलिश पोज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT