Samruddhi Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार; कारच्या धडकेत नीलगाय थेट हवेत फेकली, ३ जण गंभीर जखमी

Vashim Accident News: मात्र नीलगाय रात्रीपासून रस्त्यावर वेदनेत व्हिवळत पडलेली असून अद्याप नीलगायीला उपचार मिळालेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, वाशीम

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये कार आणि नीलगायीची धडक झाल्याने कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात नीलगाय सुध्दा गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. (Accident News)

अपघातासंबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी (महादेव) येथे हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर जखमी व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नीलगाय रात्रीपासून रस्त्यावर वेदनेत व्हिवळत पडलेली असून अद्याप नीलगायीला उपचार मिळालेला नाही.

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी दाट जंगल आहे. त्यामुळे येथून वन्य प्राणी येण्याची दाट शक्यता आहे. प्राण्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडूनये यासाठी महामार्गावर कंपाऊंड वॉल बसवलेली आहे. पण तरी नीलगाय महामार्गावर आली तरी कशी? असा प्रश्न येथे निर्माण होतोय.

समृद्धी महामार्गावर बसवण्यात आलेल्या वॉलचे काम अद्याप अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी सलग भिंत नसल्याने त्यातून वन्यजीव ये-जा करतात. त्यामुळे एक महिन्यापूर्वी देखील तब्बल १७-१८ रानडुक्कर अक्षरशः चिरडले गेले होते. मानवासाठी तत्काळ धावून जाणारी समृद्धीची यंत्रणा मुक्या जीवासाठी आडमुठे धोरण का करतेय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उमेदवारी अर्ज घातला...,भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं मराठी तुम्ही एकदा ऐकाच | VIDEO

छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

Cabbage Recipe : कोबीची भाजी आवडत नाही, मग झटपट बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Aho Meaning: लग्नानंतर बायको "अहो" का म्हणते? शब्दाचा अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

SCROLL FOR NEXT