Mumbai-Ahmedabad Highway Accident: कामावर जाताना काळाचा घाला! भरधाव कारची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Accident News: अपघातातील तिघेही नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Accident News
Accident NewsSaamtv

Mumbai- Ahmedabad Highway Accident: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामामार्गावर तलासरी इभाडपाडा येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावर दुचाकी आणि आर्टिका कारमध्ये झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident News
Pune Crime News: पुणे हादरले! तरुणाला दगडाने ठेचून संपवले, 2 आठवड्यांपूर्वीचं ते धक्कादायक कारण झालं उघड

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामामार्गावर दुचाकी आणि आर्टिका कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील तिघे तरुण हे छत्री बनविणाऱ्या संजान कंपनी मध्ये कामासाठी निघाले होते.

यावेळी त्यांची दुचाकी तलासरी इभाडपाडा येथे आली असता महामार्ग क्रॉसिंग करून गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव आर्टिका कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.. (Latest Marathi News)

Accident News
Ahemednagar News: थरारक! मद्यधुंद टेम्पो चालकाने सासू-सूनेला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

सुनील वाडकर ,किशोर कामडी ,विक्रम कामडी असे अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नाव असून मृत्यू झालेले तिघेही नाशिक (Nashik) जिल्ह्यातील हरसूल बारिमाळ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com