Mumbai Crime News: चोरीचा संशय घेत जमाव संतप्त; बेदम मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Suspicion Of Theft News: प्रविण शांताराम लहाने (29 वर्षे) असे जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV

संजय गडदे

Mumbai Theft News: मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरिवली परिसरात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रविण शांताराम लहाने (29 वर्षे) असे जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latets Crime News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बोरवली परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आले. मात्र हा तरुण चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.

Mumbai Crime News
Love Affair Crime: प्रेमाचा भयानक अंत! जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराला महिला पोलिसाने संपवलं

जमावातील व्यक्तीकडून एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर गस्तीवर असलेल्या रात्रपाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला किंवा इतर कशामुळे झाला हे त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

तरुणाच्या मृत्यूस संशयीत म्हणून 4 इसमांना चौकशीकरिता ताब्यात घेऊन पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपींवर कलम 304(2), 143,144,147,148, 149 भादविसह 37 (1) (अ), 135 मपोका अन्वये बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime News
Nana Patole News: काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस, नाना पटोलेंना हटवण्याची मागणी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com