Samruddhi Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: लग्नाचा वाढदिवस साजरा करुन ती पुण्याला निघाली; गाढ झोपेत काळाची झडप, पती-पत्नीची ताटातूट

अपघातात एका जोडप्याची देखील ताटातूट झाली आहे. मुलांनी आपल्या आईला कायमचं गमवलं आहे.

Ruchika Jadhav

चेतन व्यास

Bus Accident News: काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातात विदर्भ बस उलटली आणि तिने जागीच पेट घेतला. या दुर्घटनेत २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात एका जोडप्याची देखील ताटातूट झाली आहे. मुलांनी आपल्या आईला कायमचं गमावलं आहे. (Latest Marathi News)

या अपघातात मूळच्या आर्वी येथील रहिवासी राजश्री ओमप्रकाश गांडोळे रा. करीमनगर यांचा होरपळून मृत्यू झालाय. त्यांचे पती ओमप्रकाश गांडोळे कारंजा येथून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. आर्वीला घर बांधून त्यांनी ते घर भाड्याने देत काही कारणास्तव अमरावती येथे भाड्याने दुसरे घर घेऊन राहत होते.

त्यांची दोन्ही मुले शशांक आणि जय यांना पुण्याला नोकरी लागल्याने ते पुणे येथे राहण्यासाठी गेले होते. दोन्ही मुले खासगी कंपनीत नोकरी करतात. तिसरा मुलगा रुपेश देखील पुण्यालाच शिक्षण घेत आहे. २९ जून रोजी राजश्री आणि ओमप्रकाश हे दोघेही आर्वीला आले होते. आर्वीतील घरात राहणाऱ्या भाडेकरुंची बदली झाल्याने घर खाली केले होते.

नवीन भाडेकरू येणार असल्याने ते आर्वीतील घरी आले होते. मात्र, पुण्यात राहणाऱ्या मुलाला महत्वाची कागदपत्रे पाहिजे असल्याने पती ओमप्रकाश यांनी राजश्रीला ‘तू पुण्याला (Pune) जा, मी घरी थांबतो’ असे सांगितले. राजश्री यांच्या मामांनी त्यांना विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिले होते. मात्र मुलाला भेटण्याआधीच काळाणे राजश्री यांचा घात केला.

अपघातात राजश्री यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ओमप्रकाश गांडोळे हे तातडीने बुलढाणा येथे निघाले तर तिन्ही मुले पुण्यावरून बुलढाणा येथे रवाना झाले. राजश्री आणि ओमप्रकाश यांच्या लग्नाचा नुकताच पंचवीसावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दरम्यान राजश्री यांनी फेसबूकवर पोस्टही टाकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT