Gondia Accident News: दुर्दैवी! मजुर महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात; ४० जण जखमी

जखमींमधील १० महिला मजुराची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे...
Gondia Accident
Gondia AccidentSaamtv
Published On

शुभम देशमुख; प्रतिनिधी...

Gondia Accident News: आज संपूर्ण महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताने हादरुन गेला. समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच गोंदियामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. धान रोवणीसाठी मजुर महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. यामध्ये ४० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gondia Accident
Samruddhi Mahamarg Accident: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून मृतांना ५ लाखांची मदत जाहीर

याबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बोरगाव येथील महिला मजूरांच्या पीकअपचा भीषण अपघात (Accident) झाला. फुक्किमेटा येथे धान रोवणीच्या कामाला मिनीडोरवर बसून जात असताना वाहन चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली.

या अपघातात गाडीत बसलेल्या ४० महिला मजूर जखमी झाल्या. त्यात तर १० महिला मजुराची स्थिती गंभीर आहे. जखमींवर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गंभीर जखमी असलेल्या महिला मजुरांना गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. (Samruddhi Highway Accident)

Gondia Accident
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात २५ जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS

अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान, घटनेची माहिती देवरी पोलिसांना मिळतात पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदत करत सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com