Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १४ जण जखमी

Amravati Accident News: अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ ही घटना घडली आहे.

Priya More

Samruddhi Mahamarg :

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांची मालिका सुरू झाली आहे. एक दिवसाआड या महामार्गावर अपघात (Samruddhi Mahamarg Accident) झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये या महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीला जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये १४ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीला जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील काही अनुयायी पिकअपने दीक्षाभूमीला बाबासाहेबांना अभिवादनसाठी जात होते. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरील निंभोरा बोडखाजवळ पिकअपला अपघात झाला. चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या अपघातामध्ये अनेकांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. जखमींवर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT