Samruddhi Expressway Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Expressway Accident: गाढ झोपेत मित्रांचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; समृद्धीवरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात समृद्धीवर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडलीये. रात्री एकच्या सुमारास ट्रकचा अपघात झालाय.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati Accident: विकास आणि समृद्धीचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ३० जून २०२३ रोजी येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताच्या आठवणी पुसट होत नाही तोच समृद्धीवर आणखीन आपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यात समृद्धीवर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडलीये. रात्री एकच्या सुमारास ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सरद ट्रक नागपूरयेथून मुंबईकडे निघाला होता. रात्रीच्यावेळी झोप लागल्याने पुलाच्या सिमेंट कठड्यावर ट्रॅक धडकला.

समृद्धीवर ट्रक वेगात होता. भरधाव ट्रक इतका जोरात धडकला की ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झालाय.

भरधाव दुचाकी आणि कारचा भीषण अपघात

भरधाव वेगातील दुचाकी कारवर अदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. नांदेड शहरालगत असलेल्या हसापूर बायपासवरील मामा चौक परिसरात ही घटना घडली आहे. सदर घटनेत रोहित मुदिराज असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिना निमित्त मित्रांनी मोटार सायकल रॅली काढली होती. या रॅलीत रोहित देखील शामिल झाला होता.

रोहित हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारला दुचाकी धडकली. दुचाकी जास्त वेगात असल्याने धडकेत रोहित उंच हवेत फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या भीषण अपघातात कारचा आणि दुचाकीच्या काही भागाचा चुराडा झालाय. मयत रोहित मुदिराज हा काँग्रेस पदाधिकारी व्यकंट मुदिराज यांचा मुलगा होता. अपघाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

SCROLL FOR NEXT