Samriddhi Highway Accident CM Eknath Shinde Inspection Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Accident: शहापूर दुर्घटनेत 20 कामगारांचा मृत्यू, मृतांची नावे समोर; मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

Satish Daud

Samruddhi Mahamarg Accident News: शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर पुलावर गर्डर टाकताना सोमवारी (३१ जुलै) रात्री क्रेन कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत 20 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनाचा लाँचर आणि 1 हजार 250 टनाचा गर्डर आहे.

हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्देवाने लाँचर आणि गर्डर खाली पडल्याने ही घटना घडली आहे. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी आहेत. 5 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या ठिकाणी 28 जण काम करीत होते.

या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे. कशामुळे लाँचर आणि गर्डर पडला याचा तपास करण्यात येईल. या चौकशीमध्ये जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनीदेखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असं शिंदे म्हणाले.

समृद्धी महामार्ग अपघातीत मृतांची नावे

  • संतोष जे एतंगोवान (सिनियर ग्रँटी मॅनेजर,वय 35 रा. 2/225, व्हीआयपी नगर, लक्ष्मी निवास, बोगनपल्ली, टाटा शोरुमच्या मागे, कृष्णागिरी, तामिळनाडू.

  • कानन व्ही वेदारथिनम (पीटी इंजिनिअर, वय 40, 3/138, पप्पू रेत्तीकुथागाई, वेधारण्यम टीके, अयक्करांबलम, अयक्करांबूलम, नागपट्टम, तामिळनाडू-६१४७०७)

  • प्रदिप कुमार रॉय, (हायड्रॉलिक टेक्निशियन, वय 45, रा. मणिबाला रॉय, दक्षिण खट्टीमारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735210)

  • परमेश्वर खेदारूलाल यादव (विंच ऑपरेटर, वय 25, रा. वॉर्ड क्रमांक-15, सुभाष नगर, मलाहिया, सैदपूर, गाझीपूर, उत्तरप्रदेश-233304),

  • राजेश भालचंद्र शर्मा (हायड्रॉलिक ऑपरेटर, वय 32, रा. नौगावा थागो, उधम सिंग नगर, उत्तराखंड-262308)

  • बाळाराम हरिनाथ सरकार (सुपरवायझर, धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224)

  • अरविंद कुमार उपाध्याय (सुपरवायझर, वय 33, रा. 1048, बलुआ, नागरा, बलिया, उत्तरप्रदेश -221711)

  • नितीनसिंह विनोद सिंह (वय 25, रा. रसरा, बलिया, उत्तर प्रदेश -221712)

  • आनंद कुमार चंद्रमा यादव, (वय 25, रा. गौरा मदनपुरा, एकेल, बलिया, उत्तर प्रदेश -221711)

  • लल्लन भुलेट राजभर (वय 38, रा. देहारी, कटवारी, बलिया, रसरा, उत्तरप्रदेश -२२१७१२)

  • राधे श्याम भीम यादव (वय 40, रा. गौरा मदनपुरा, नागरा, बलिया, उत्तर प्रदेश -221711)

  • सुरेंद्र कुमार हुलक पासवान (वय 35, रा. विल-माली अरवल, बिहार-804419)

  • पप्पू कुमार कृष्णदेव साव (वय 30, रा. विल-माली, ठाणे-बंशी, अरवल, बिहार-804419)

  • गणेश रॉय (वय 40, रा. पश्चिम डौकीमारी, गरियालतारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735233)

  • सुब्रोतो धिरेन सरकार (वय 23, रा. धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224)

  • लवकुश कुमार राम उदित साव (वय 28, रा. ग्राम एन पोस्ट-माली, अरवल, बिहार-804419)

  • मनोज सिंह इंद्रदेव यादव (वय 49, रा. नंदन, बक्सर, डुमराव, बिहार-८०२११९)

  • राम शंकर यादव (वय 43, उत्तरप्रदेश), सत्य प्रकाश पांडे (वय 30, बिहार), सरोजकुमार (वय 18, उत्तर प्रदेश)

जखमींवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर

प्रेम प्रकाश अयोध्य साव (वय 37) यांच्या पायाला दुखापत झाली असून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किशोर हिव (वय 40) व चंद्रकांत वर्मा (वय 36) या दोघा जखमींना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT