sambhajiraje chhatrapati and governor bhagat singh koshyari
sambhajiraje chhatrapati and governor bhagat singh koshyari saam Tv
महाराष्ट्र

हे महाशय केवळ राज्यपालपदाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळताहेत; संभाजीराजे कडाडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyrai) यांनी मुंबईबाबत (Mumbai) वादग्रस्त विधान केलं आहे.'गुजराती लोक मुंबईतून गेले,तर पैसे राहणार नाहीत.आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारींवर खरमरीत टीका केली आहे. विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असं म्हणत संभाजीराजे यांनी कोश्यारींवर टीकास्त्र सोडले आहे.

संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं की, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT