sambhajiraje chhatrapati, governor bhagat singh koshyari, maharashtra , mumbai , maratha reservation , ews reservation saam tv news
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : सामाजिक रचना बिघडेल असं बाेलणं राज्यपालांनी टाळावं : संभाजीराजे

स्वराज्य संघटनेचे काम महाराष्ट्रात पाेचविण्याचे काम मी करीत आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : राज्यपाल (governor bhagat singh koshyari) हे राज्याचे (maharashtra) प्रथम नागरिक आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक रचना बिघडेल अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी टाळणं गरजेचे आहे असे मत माजी खासदार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी नमूद केले. (sambhajiraje chhatrapati news)

अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची (Mumbai) ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी शुक्रवारी केलं हाेतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर एनसीपी, काॅंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागवी अशी मागणी नेत्यांच्या माध्यमातून जाेर धरु लागली आहे. तसेच राज्यपालांच्या वक्तव्यावर काही नेत्यांनी त्यांनी जबाबदारीनं बाेललं पाहिजे असं देखील म्हटलं आहे. (bhagat singh koshyari news)

संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सर्वांचा आहे. महाराष्ट्रला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा लाभला आहे. या राज्यात सर्वाना राहण्याचा अधिकार आहे असं देखील म्हटलं आहे. दरम्यान राज्यात लवकरात लवकर मंत्री मंडळ स्थापन झालं पाहिजे. जेणे करुन प्रलंबित प्रश्नांवर याेग्य ताे ताेडगा निघेल. इकडे तिकडे दौरे करण्यापेक्षा मंत्रिमंडळ स्थापन करून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा राजेंनी शिंदे फडणवीस सरकारकडून व्यक्त केली आहे. (eknath shinde news)

मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) राजे म्हणाले मुख्यमंत्री हाेण्यापुर्वी ते माजी मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आले हाेते. त्यामुळे त्यावेळी ज्या मागण्या मान्य केल्या त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी सध्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे असे नमूद केले.

नामकरण का हाेत नाही ?

औरंगाबादचं संभाजीनगर (sambhajinagar) असं नामकरण करण्याचा निर्णय योग्य आहे. ताे आधीच व्हायला हवा होता, पण का होत नाही. लोकांना माहिती हवे की हा राज्याचा अधिकार की केंद्राचा. कोल्हापूर विमानतळाचा (kolhapur airport) नामकरण राजर्षी राजाराम महाराज व्हावे म्हणून राज्याचा ठराव झाला पण अजून का होत नाही. लोकांना फसवण्यापेक्षा जे करायचे ते नामकरण करा असेही संभाजीराजे छत्रपतींनी एका प्रश्नावर बाेलताना आपलं मत व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT