Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje Chhatrapati Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या २ पैलवानांमध्ये रंगतदार कुस्ती, मला आनंद आहे...: संभाजीराजे

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर रणधुमाळी घालणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha election) आज शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. महाविकास आघाडीसह भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु, भाजपने (BJP) ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणीला विलंब झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली असताना छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात तुफान रंगली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी संभाजीराजे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पण, आज निवणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नाव न घेता शिवसेना आणि भाजप उमेदवारांबद्दल प्रतिक्रिया दिलीय.

शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे धनंजय महाडीक (Dhananjay mahadik) हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमने-सामने आहेत. त्यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याच्या चर्चाही होत्या. मात्र, हे दोन्ही उमेदवार कोल्हापूरचेच असल्याने कुणीतरी एक कोल्हापुरचा खासदार होणार, याचा आनंद संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरु आहे. मला आनंद आहे, कोल्हापुरचाच खासदार होणार, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT