Sambhajinagar Accident  saam tv
महाराष्ट्र

Accident : भीषण अपघात! ट्रक-टँकरची जोरदार धडक, टँकरखाली दबून सासू-जावयाचा दुर्दैवी अंत

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ घाटात भीषण अपघात झाला. ट्रक आणि टँकरच्या झालेल्या धडकेत टँकर बेल्ट तुटून आडवा पडला. टँकरखाली दबून दोघांचा मृत्यू झाला.

Yash Shirke

  • छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ घाटात भीषण अपघात.

  • आयशर ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक.

  • दोन जणांचा जागीच मृत्यू. घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी.

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात आज (११ सप्टेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. आयशर ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वेरूळ लेणीच्या लेणी क्रमांक एकच्या वरच्या बाजूस असलेल्या भागांमध्ये औद्योगिक टँकर घेऊन जाणारा आयशर ट्रक व 16 टायर ट्रक या दोघांच्या समोरासमोर झालेल्या धडकीमध्ये औद्योगिक वापरासाठी नेण्यात येणारा टँकर हा रस्त्यावर बेल्ट तुटून आडवा पडल्याने त्याखाली दबून दोन निष्पक जीवाचा करून अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

वेरूळ येथील रहिवासी कचरू सांडू त्रिभुवन सांडू त्रिभुवन (वय ४२) हे त्यांची सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव (वय ६५) राहणार राजीव गांधीनगर खुलताबाद यांना घेऊन ते खुलताबाद येथे नेऊन सोडण्यासाठी जात होते. तेवढ्यात कन्नड होऊन संभाजीनगर कडे जाणारा आयशर ट्रक व खुलताबादहून कन्नडकडे जाणारा 16 टायर ट्रक यात समोरासमोर धडक झाल्याने आयशर ट्रकमध्ये असलेल्या औद्योगिक टँकरचा बेल्ट तुटून टँकर हा रस्त्यावर आडवा पडला.

या घटनेमध्ये कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासुबाई चंद्रभागाबाई भालेराव दबल्या या घटनेमध्ये जावई आणि सासूचा जागीच करून अंत झाल्याची घटना घडली. यात सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सीउद्दीन यांनी कचरू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई भालेराव यांना घेऊन खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूने खुलताबाद शहरासह संपूर्ण वेरूळ गाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Banner Controversy: वाल्मिक कराडसाठी निधी मागणाऱ्या व्हायरल पोस्टरमागे कोण?

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

SCROLL FOR NEXT